लग्नानिमित्त भटक्या कुत्र्यांना खाऊ घातले !

Eureka Apta and Joanna Wang from Odisha

भुवनेश्वर :- ओडिशातील युरेका आप्टा आणि जोआना वांग (Eureka Apta and Joanna Wang from Odisha) यांनी साध्या पद्धतीने लग्न केले आणि लग्नानिमित्त सुमारे ५०० भटक्या कुत्र्यांना (500 stray dogs) खाऊ घातले! युरेका आप्टा पायलट आणि चित्रपट निर्माता आहे. दोघेही प्राणिप्रेमी आहेत.

युरेका आप्टा यांनी सांगितले, ‘लॉकडाऊनमध्ये आमचा एक मित्र सुकन्यापतीने अपघात झालेल्या एका भटक्या कुत्र्याचा जीव वाचवला. मी जोआनासोबत भटक्या कुत्र्यांवर उपचार करवून घेतले होते. त्यानंतर आम्ही त्याला एनिमल वेलफेअर ट्रस्ट एकमरा या डॉग शेल्टरमध्ये (AWTE) घेऊन गेलो. तिथे कुत्रे आनंदात खेळत होते; त्यांची काळजी घेतली जात होती. तीन वर्षांच्या ओळखीनंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले व कुत्र्यांसाठी काहीतरी चांगले करण्याचा विचार केला. डॉग शेल्टर होमसाठी खाद्य आणि औषधे खरेदी केली आणि AWTE चे संस्थापक पूरबी पात्रा यांच्या मदतीने भटक्या कुत्र्यांच्या मदतीसाठी शहरात व्यापक मोहीम सुरू केली.

ही बातमी पण वाचा : ‘गौसत्व कवच’ : गाईच्या शेणापासून बनवली ‘रेडिएशन रोधक चिप’ – कामधेनू आयोग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER