छोटा पॅकेट बडा धमाका शशांकचा भन्नाट अनुभव

Shashank

सणासुदीचे दिवस आले की प्रत्येक पट्टीच्या ग्राहकाला वेध लागतात ते ऑनलाईन शॉपिंगचे. आपल्याला हवी असलेली वस्तू वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साईटवर फिरून बुक करायची आणि मग ती आपल्या दारात कधी येणार याची वाट बघायची यामध्ये एक वेगळीच मजा असते. असेच ऑनलाइन शॉपिंगचे किस्से अनेकांकडे भरपूर असतात असाच एक किस्सा अभिनेता शशांक केतकर याने त्याच्या इंडीड कैंडिड त्याच्या युट्युब चॅनेल वर शेअर केला आहे. छोटा पॅकेट बडा धमाका अशी टॅगलाईन देत त्याने शेअर केलेल्या या अनुभवावर अर्थात हास्याचा पाऊस पडला आहे.

त्याचं झालं असं की शशांकची पत्नी प्रियंका हिने एका ऑनलाईन साइटवरून एक कॉस्मेटिक बुक केलं. सात दिवसात डिलिव्हरी येणार असल्यामुळे आपण बुक केलेली वस्तू कधी येणार याची ते वाट बघत होते. आणि अचानक एके दिवशी त्यांच्या दारात एक भलामोठा बॉक्स घेऊन ऑनलाइन शॉपिंगचा कुरियर एजंट आला. खरंतर मागवलेली वस्तू फार मोठ्या करायची नव्हती मग एवढा मोठा बॉक्स कसला असा प्रश्न शशांक आणि प्रियंकाला पडला. पण सगळेच डिटेल्स बरोबर असल्याने त्यांनी तो मोठा बॉक्स घेतला.

आता सुरु झाली तो बॉक्स उघडण्याची आणि त्यात नेमक काय आहे हे पाहण्याची उत्सुकता वाढली. कागदाने गुंडाळलेला तो बॉक्स शशांक उघडू लागला आणि त्यामध्ये प्रियंकाने मागवलेली एक छोटी, अगदी हाताच्या मुठीत बसेल इतकी मॉइश्चरायझर डबी होती.

ही मॉइश्चरायझर ची डबी आपणच बुक केली होती ती तर खात्री होतीच. पण याच्यासाठी इतका मोठा बॉक्स कशाला हा प्रश्न काही सुटला नाही. मात्र छोट्याशा डबी साठी एवढे मोठे पॅकिंग केल्याचं बघून त्या दोघांनाही चक्क हसायला आले . आणि त्यांनी हा किस्सा शेअर करायचं ठरवलं. शशांक सांगतो, आपण पूर्वी शाळा-कॉलेजमध्ये असताना मित्र मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं असेल तर वस्तू छोटी असली तरी ती कागदात गुंडाळून गुंडाळून त्याचं भलं मोठं पॅकेट करायचो आणि त्यानिमित्ताने एक मजा-मस्ती व्हायची. हे पॅकेट उघडून त्यात छोटीशी डबी सापडल्यानंतर मला याच गोष्टीची आठवण आली. शेअर केलेल्या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी देखील दिलखुलासपणे हसून दाद दिली आहे.

शशांक अजूनही काही विनोदाच्या मुडमधुन बाहेर येत नव्हता. त्याने त्या बॉक्सला गुंडाळलेला कागद फेट्यासारखा डोक्याला बांधत हे पहा केवढा मोठा कागद अशी ओळही लिहिली आहे. सुखाच्या सरिनी हे मन बावरे ही त्याची मालिका नुकतीच ऑफ एयर गेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शशांकने कोरोनावर देखील मात केलीय. आता पुढचे काही दिवस तो सुट्टीचा आनंद घेणार आहे. याच दरम्यान या ऑनलाइन शॉपिंग च्या निमित्ताने घडलेली धमाल त्याच्यासाठी चार्जिंग ठरले असे तो सांगतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER