कोल्हापुरात घुमला वनमंत्री राठोड हाय हायचा नारा

KOlhapur

कोल्हापूर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तत्काळ अटक करावी त्याचबरोबर मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करीत भाजप महिला मोर्चाच्यावतीने बिनखांबी गणेश मंदिर येथे जोरदार निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उद्धव ठाकरे जागे व्हा पूजाला न्याय द्या’, शरद पवार जागे व्हा पूजाला न्याय द्या, सोनिया गांधी जागे व्हा पूजाला न्याय द्या, अनिल देशमुख जागे व्हा खुनाचा गुन्हा दाखल करा, आघाडी सरकार हाय हाय, पूजा ला न्याय द्या, नुसतेच बोलतात गोरे गोरे झाले थोबाड यांचे काळे अशा आशयाचे बोर्ड घेऊन महिला मोर्चा पदाधिकारी यांनी बिनखांबी गणेश मंदिर परिसरात प्रमुख तीन रस्ते आडवून जोरदार घोषणाबाजी केली.

तीघाडी सरकारमध्ये अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असताना कोणीही पुढाकार न घेता मंत्री राठोड यांची पाठराखण करत आहेत. दडपशाहीचे राजकारण करुन पिडीतांवर त्यांच्या नातेवाईकांवर दबाव आणून गुन्हे दाखल करून घ्यायचे नाहीत किंवा मागे घेण्यास भाग पाडायचे असे प्रकार सध्या राज्यात सुरु आहेत. असा आरोप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा गायत्री राउत यांनी केला. संजय राठोड यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा त्यांच्यावर सदोष मनुष्यवध – गुन्हा दाखल व्हावा. अशी मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER