राज्यात आज कोरोना रूग्ण संख्येत किंचित वाढ, १२ हजार २०७ नव्या करोनाबाधितांची नोंद

Coronavirus Maharashtra

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच राज्यात कोरोना (Corona) रूग्णांची संख्या किंचित वाढली आहे. गुरुवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १२ हजार २०७ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये १० हजारांच्या घरात आला होता. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५८ लाख ७६ हजार ०८७ इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ६० हजार ६९३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू करून ५ दिवस उलटले असून आज नव्या करोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढला आहे.

राज्यात आज एकीकडे नवे करोनाबाधित वाढले असले, तरी दुसरीकडे ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ५६ लाख ८ हजार ७५३ इतका झाला आहे. त्यामुळे अजूनही राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वरच असून तो ९५.४५ इतका नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वर असताना आज राज्यात मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बुधवारी राज्यात २६१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. आज हा आकडा वाढून ३९३ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर १.७७ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत राज्यात करोनामुळे १ लाख ३ हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button