थपडेवर थप्पड… थपडेवर थप्पड, भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई :- कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतून (केडीएमसी) १८ गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्दबातल केल्या. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या (BJP) नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टोलेबाजी सुरू केली आहे.

ही बातमी पण वाचा : भाजपच दुःख समजू शकतो, पण महाराष्ट्राला त्रास देणं चालणार नाही; संजय राऊतांचा इशारा

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जोरदार टोला लगावला आहे. शिवसेनाला मोठा धक्का; ‘ती’ १८ गावे पालिकेतच कल्याण-डोंबिवली महापालिकेतून (केडीएमसी) १८ गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्दबातल केल्या… थपडेवर थप्पड… थपडेवर थप्पड… असा टोला भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी लगावला आहे.

दुसरीकडे मेट्रो कारशेडसाठी कांजूर मार्गच्या जमिनीवरील कार्य थांबवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाचा हा निर्णय दुर्दैवी आहे. यात मोठं षडयंत्र असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. त्यावरुन भातखळकर यांनी संजय राऊतांवर कारवाईची मागणी केली. न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान (Contempt of court) असून याविरुद्ध संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER