चीनच्या विरोधाला ठेंगा; राष्ट्रीय दिनाच्या भारताने दिल्या शुभेच्छा, तैवानने मानले आभार

tsai ing-wen xi jinping

दिल्ली : तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त भारत सरकारने अधिकृतपणे शुभेच्छा दिल्याबद्दल तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग-वेन (tsai ing-wen)यांनी भारतीयांचे आभार मानले.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की चीन, तिबेटप्रमाणे तैवानही बळकावण्याच्या प्रयत्नात आहे. तैवानला चीनचाच भाग मानतो. मात्र, तैवानला चीनचा  (China)दावा मान्य नाही. तैवानमध्ये स्वतंत्र लोकशाही विचार मानणारी जनता मोठया संख्येत आहे.

१० ऑक्टोबरला तैवानच्या राष्ट्रीय दिन होता. यानिमित्त तैवानला कुणी शुभेच्छा देऊ नये, असे सूचित करताना चीनने म्हटले होते की, तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे, हे सत्य बदलता येणार नाही. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी भारताला संदेश दिला होता – तैवानचा राष्ट्रीय दिवशी या प्रदेशाचा उल्लेख स्वतंत्र देश म्हणून करू नये.

तैवानच्या राष्ट्रीय दिनी, १० ऑक्टोबरला भारत सरकारसोबत अनेकांनी तैवानला शुभेच्छा दिल्या. याबाबत आभार व्यक्त करताना तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग-वेन यांनी ट्विट केले – तैवानच्या राष्ट्रीय दिनी शुभेच्छा दिल्याबद्दल भारतातील सर्व मित्रांचे आम्ही आभार मानतो! असे तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. तैवानचा राष्ट्रीय दिन १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला.

https://twitter.com/iingwen/status/1315140681980026880

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER