
नवी दिल्ली : समयसूचकता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मोठा गुण आहे. मोदी यांनी आज कोरोनाची लस (Coronavirus Vaccine) घेतली. लस घेण्यासाठी ते दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये गेलेत. त्यावेळी, त्यांना लस देणाऱ्या परिचारिकांवर दडपण आले होते. हे मोदींच्या लक्षात आले. मोदींनी आधी हजर कर्मचाऱ्यांशी बोलून दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला.
लस टोचणाऱ्या परिचारिकेला मोदींनी विचारले – लस टोचण्यासाठी तुम्ही जनावरांच्या इंजेक्शनची सुई वापरणार आहेत का? मोदी असे का विचारत आहेत हे परिचारिकांच्या लक्षात आले नाही. त्यावर मोदींनी खुलासा केला – राजकारणी लोकांची कातडी जाड असते म्हणून विचारले! यावर सगळे मनमोकळे हासले आणि वातावरणातील दडपण दूर झाले. परिचारिकेने मोदींना सहज लस टोचली. मोदी म्हणालेत, लस टोचल्याचे मला जाणवलेही नाही.
लस घेण्यासाठी मोदी सोमवारी सकाळी लवकर एम्समध्ये गेलेत. त्यावेळी रस्ता मोकळा होता त्यामुळे त्यांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवावी लागली नाही किवा वाहतुकीचे मार्ग बदलावे लागले नाहीत. यावेळी एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया देखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी लस घेतल्यानंतर सर्व प्रोटोकॉलचे पालन केले, अर्धा तास तिथेच थांबले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला