स्केटिंग रोल बॉल स्पर्धा : सेन्टर पॉईंट शाळेला दुहेरी मुकुट

RBFI (4)

नागपूर :- आर.बि.एफ.आय मान्यताप्राप्त जिल्हा रोल बॉल संघटनेच्या वतीने आयोजित १४ व १७ वर्षाखालील आर.बि.एफ.आय जिल्हास्तरीय स्केटिंग रोल बॉल स्पर्धेत सेन्टर पॉईंट स्कूलच्याला मुलाच्या आणि मुलीच्या गटात सुवर्ण पदक पटकाविले.

जगत पब्लिक स्कूल, एन.के.पी.साळवे अकॅडमी, प्रियदर्शनी पब्लिक स्कूल, ब्लॉसम हायस्कूल, स्वामीनारायण स्कूल, सेन्टर पॉईंट स्कूल आदी शाळेच्या संघांनी सक्रिय सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सेन्टर पॉईंट स्कूल, वर्धमाननगरच्या मुले आणि मुलींच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विविध सहभागी संघांचा पराभव करीत १४ व १७ वर्षाखालील जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धेच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

ही बातमी पण वाचा : एलिसन फेलिक्स सलग नवव्यांदा अमेरिकेच्या एथलेटिक्स संघात

मानसी पुगलीया, सोहांशी खंडवानी, शानवी सापल्या, आर्या जयपुरीया, सिद्धी सूचक, अनिका प्रसाद, सुहानी लोया, तस्किन चिमठाणावला, विधी बोधारे व अवनी गुप्ता तर मुलाच्या संघात निकुंज ठाकर, रोनीत कालरा, समक्ष लोंढे, सुलतान चिमथानावाला, संकेत माहेश्वरी, अन्वेष ठवकर, प्रणित शाहु व मोईझ सैफी आदी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत संघाला सुवर्णपदक पटकाविले.

स्पर्धा शैलेंद्र पाराशर यांच्या नेतृत्व व दिशनिर्देशात घेण्यात आली. किरण पाराशर, शिवछत्रपती पुरस्कार विजेता पियुष आकरे, पंकज शिंदे, आदित्य चितपल्लीवार, राजन उमाळे, शशांक कश्यप, स्वप्निल समर्थ यांनी स्पर्धा यशस्वी केली.