जामिनावर सुटलेल्या नराधमाने सोळा वर्षीय तरूणीवर केला अत्याचार

झटपट कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Girl Torture

औरंगाबाद :- बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर असलेल्या नराधमाने पुन्हा सोळा वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नराधमाने १६ वर्षीय तरूणीचे अपहरण करून निर्जनस्थळी नेल्यानंतर पुन्हा अत्याचार केला. ही घटना छावणी परिसरात ६ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. याविषयी पिडीतेची तक्रार प्राप्त होताच छावणी पोलिसांनी झटपट कारवाई करत आरोपी नराधमाला बेड्या ठोकल्या.

ही बातमी पण वाचा : महिलेची सोनसाखळी खेचल्याबद्दल गुन्हा दाखल

सागर सुनिल श्रीसुंदर (रा. शांतीपुरा, छावणी परिसर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार १६ वर्षीय तरूणी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्रार्थनास्थळी गेली होती. तेथील प्रार्थना आटोपल्यानंतर रात्री साज वाजेदरम्यान ती पायी घरी जात होती. तेथील एका चौकात रिक्षा घेऊन आलेल्या सागरने तिला गाठले आणि शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने रिक्षात बसवले. यानंतर आरोपीच्या संागण्यावरून रिक्षाचालकाने त्यांना कब्रस्तान रस्त्यावर नेऊन सोडले आणि रिक्षासह चालक तेथून निघ्ून गेला. कब्रस्तान निर्जनस्थळ असल्याचे पाहून आरोपी तिला ओढतच घेऊन गेला. पिडीता आरडाओरड करून आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तो तिला बेदम मारहाण करत होता. निर्जनस्थळ असल्याने तिचा आवाज कोणाच्याही कानावर पडत नव्हता. जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर नराधमाने अत्याचार केला. रात्री दहावाजे दरम्यान तिने स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. यानंतर थेट घरी जाऊन घडलेल्या अत्याचाराची माहिती तिने रडतच आईला सांगितली. याप्रकारामुळे पिडीता आणि तिच्या कुटूंबाला मानसिक धक्का बसला.

या प्रकरणानंतर आरोपीला न घाबरता पिडीतेला घेऊन तिचे आई-बाबा दुसऱ्या दिवशी सकाळी छावाणी पोलिस ठाण्यात गेले. पिडीतीने दिलेल्या फार्यादीवरून पोलिसांनी आरेापी सागरविरोधात विविध कलमानुसार गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठाेकल्या. न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांनी दिली.

जामीनावर सुटल्यावर पुन्हा अत्याचार
आरोपी सागर याने काही महिन्यापूर्वी तक्रारदार मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा नोदंवून त्याला अटक केली होती. त्या केसमध्ये आरोपीला न्यायालयाने सशर्त जामीन दिल्यापासून तो जेलमधून बाहेर आला आहे. दरम्यान आरोपीने ६ राेजी पुन्हा पिडीतेवर अत्याचार केल्याचे पो. नि. पगारे यांनी सांगितले.