
सांगली : बुधवारी रात्री पावणेअकरा सांगली जिल्ह्यात आणखी सहाजनांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. काल दिवसभरात एकूण दहा कोरोना रुग्ण समोर आले आहेत .
यामध्ये वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, खेराडे वांगी तालुका कडेगाव येथील 45 वर्षीय स्त्री , कामत, तालुका आटपाडी येथील 54 वर्षीय स्त्री (सदर महिलेचा पती पूर्वीच पॉझिटिव्ह आला असून ऍडमिट आहे .) शिरगाव , तालुका तासगाव येथील 62 वर्षे पुरुष, ठाणापुडे, तालुका वाळवा येथील 29 वर्षीय पुरुष, चिंचोली, तालुका वाळवा येथील 43 वर्षे पुरुष कोरोणा बाधित झाले आहेत. हे सर्वजण मुंबई येथून आलेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला