अश्विनच्या कुटुंबातील चार बालकांसह सहा जणांना कोरोनाची बाधा

Ravichandra Ashwin family Is Covid Positive - Maharashtra Today

भारताचा सफल अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा भल्या भल्या फलंदाजांना सतावत असला तरी कोरोनाने (CORONA) त्याला जाम सतावले आहे. त्याच्या कुटुंबातील थोडेथोडके नाही तर १० सदस्य कोरोनाबाधित आहेत आणि यामुळे गेला आठवडा अतिशय वाईट गेला, असे अश्विनची पत्नी प्रीती नारायणन (Prithi Narayanan) यांनी म्हटले आहे. प्रीती यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुटुंबातील सहा जाणते आणि चार बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. या आपल्या कुटुंबीयांच्या उपचार व मदतीसाठीच अश्विनने आठवडाभरापूर्वी आयपीएलमधून माघार घेतली होती. यंदाच्या मोसमात अश्विन दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आहे.

प्रीती यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार बारीक आवाजात हाय म्हणण्या इतपतच आपल्यात त्राण उरले आहे. मुलांच्या माध्यमातून हा आजार पसरला आणि नातेवाइकांवर वेगवेगळ्या दवाखान्यांत आणि वेगवेगळ्या घरांमध्ये उपचार सुरू आहेत. हा आठवडा अतिशय वाईट गेला आणि तीनपैकी एक पालक घरी आले आहेत. कृपया मास्क वापरा आणि लस घ्या, असे प्रीती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मला वाटते शारीरिक स्वास्थ्य लवकर सुधारते; पण मानसिक स्वास्थ्यासाठी खूप वेळ लागतो. बाधा झाल्यापासून पाचव्या ते आठव्या दिवसाचा काळ अतिशय खराब गेला.

प्रत्येक जण तिथे असतो, तुम्हाला मदत करत असतो तरीसुद्धा तुमच्यासोबत कुणीच नसते. खूपच एकटेपणा, एकाकीपणा आणणारा आजार आहे हा! म्हणून कृपया लोकांपर्यंत पोहचा आणि मदत मिळवा. या विषाणूपायी ज्या डोकेदुखीचा सामना करावा लागतो त्याबद्दल तर ट्विटरवर एक थ्रेडच लिहिता येईल असे त्यांनी म्हटले आहे. २५ एप्रिलला आपल्या गावातच म्हणजे चेन्नईत सनरायझर्सविरुद्ध खेळल्यानंतर अश्विनने कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी आयापीएलमधून माघार घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button