सांगली पोलीस दलात सहा आय-बाईकचा समावेश.

सांगली :-  सांगली जिल्हा पोलीस दलात सामील होत असलेल्या आय-बाईक कार्यप्रणालीचे उद्घाटन शुक‘वारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. िअभजीत चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना या कार्यप्रणालीचा अवलंब काटेकोरपणे व्हावा. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी सदैवं उपलब्ध असावेत , याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी व्यक्त केले.

सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांचा पक्षनेतृत्वाला ईशारा.

कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या सुचानेची अंमलबजावणी करताना सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी आय-बाईक कार्यप्रणालीचा पोलीस दलात समावेश केला. याविषयी माहिती देताना दुबुले म्हणाल्या, आय-बाईक म्हणजे गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळावरुन भौतिक पुरावे गोळा करण्याचे साधन आहे. यामध्ये एक दूचाकी आणि त्यावर दोन कर्मचारी असतील. त्या कर्मचार्‍यांच्या पाठीवर असलेल्या सॅकमध्ये घटनास्थळावरचे पुरावे गोळा करण्याची अद्यावत साधनसामुग‘ी असेल. प्रत्येक पोलीस उपविभागीय िअधकारी पातळीवर एक दूचाकी उपलब्ध असणार आहे. ती त्या विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे हद्दीत गुन्हा घडलेल्या ठिकाणी लवकर पोहचेल, अशा ठिकाणी सज्ज असणार आहे. गुन्हा घडल्यानंतर तात्काळ मिळालेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे संबधित गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. भौतिक पुरावे शास्त्रीय पध्दतीने गोळा करणे, तसेच घटनास्थळाची फोटोग‘ाफी, व्हिडीओग‘ाफी करणे या कामी तपासी िअधकार्‍यांना मदत होणार आहे.