सिडनी क्रिकेट ग्राउंडवरुन सहा उपद्रवी प्रेक्षकांची हकालपट्टी

Six expelled from SCG

भारत आणि आॕस्ट्रेलियादरम्यानच्या तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशीसुध्दा सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground -SCG प्रेक्षकांचा उपद्रव सुरु राहिला. शनिवारीसुध्दा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) व जसप्रीत बुमरा (Jaspreet Bumrah) यांना वर्णद्वेषी शिवीगाळ (Racial Abuse) होण्याचे प्रकार घडले होते. या प्रकारांनंतर रविवारी सहा जणांची एससीजीवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. मोहम्मद सिराजने पंचांकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रेक्षकांच्या गोंधळामुळे रविवारीसुध्दा 10 मिनिटे खेळात व्यत्ययसुध्दा आला होता.

आॕस्ट्रेलियाच्या डावातील 87 व्या षटकात सिराज हा फाईन लेगकडून आपले सहकारी व पंच पाॕल रायफेल व पॉल विल्सन यांच्याकडे आला, त्यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर पंच रँडविक एण्डकडे गेले. मैदानातील सुरक्षा रक्षकही तिथे पोहोचले तर पोलिसांनी स्टँडमध्ये घुसुन उपद्रवी प्रेक्षकांचा शोध सुरू केला. काही वेळानंतर पोलिसांनी सहा जणांना मैदान सोडून जाण्यास सांगितले आणि त्यानंतरच खेळ पुढे सुरू झाला.

याआधी शनिवारीसुध्दा सिराज व बुमरा यांना शिवीगाळ होण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर क्रिकेट आॕस्ट्रेलियाचे सुरक्षा प्रमुख सीन कॕरोल यांनी म्हटले आहे की, जो कुणी असे कृत्य करत असेल त्याला आॕस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये स्थान नाही. अशा रंगभेदी वर्तनाचा क्रिकेट आॕस्ट्रेलिया कडक शब्दात निषेध करते. या प्रकरणातील दोषींची ओळख पटली तर क्रिकेट आॕस्ट्रेलिया ही छळवणूक विरोधी कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करेल. त्यात बंदी, निर्बंध किंवा न्यूसाउथ वेल्स पोलिसांकडे हे प्रकरण सोपविण्यात येईल. यजमान म्हणून आम्ही भारतीय संघाची माफी मागतो असेही त्यांनी म्हटले आहे. यासांदर्भात दोषींना हुडकून काढण्यासाठी सीसीटीव्ही फूटेजही तपासले जात असल्याची माहीती देण्यात आली.

ही बातमी पण वाचा : कृणाल पांड्याने शिविगाळ केली, धमकावले- दीपक हुडाची लेखी तक्रार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER