राजस्थान हादरले! रस्ता चुकलेल्या बसचा वीजेच्या तारेला स्पर्श; सहा जणांचा मृत्यू

six-died-and-seven-injured-as-a-bus-contact-with-electric-wire

जालोर, (राजस्थान) : राजस्थानमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री एक आराम बसचा विद्युत तारेला स्पर्श (Electric Wire)झाल्याने बसमध्ये विद्युत प्रवाह पसरला. यामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला (6 Die) आहे. तर जवळपास २० हून अधिक प्रवासी होरपळले आहेत. प्रवाशांनी भरलेली बस विजेच्या तारांमध्ये अडकली. त्यांना काही समजण्याच्या आतच संपूर्ण बसमध्ये आग पसरली. दुर्दैवी यात्रेककरुंना बस बाहेर पडण्याची देखील संधी देखील मिळाली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालोरच्या महेशपूर गावात ही घटना घडली. या बसमध्ये बरेच प्रवाशी होते. रस्ता चुकल्यामुळे ही बस महेशपूर गावानजीक पोहोचली. त्याठिकाणी ड्रायव्हरला रस्त्यावर एक वीजेची तार लोंबकळताना दिसल्यामुळे बस थांबवण्यात आली. तेव्हा क्लीनर बसच्या टपावर चढला आणि त्याने एका काठीच्या मदतीने वीजेची तार वर उचलून धरली. त्यानंतर ड्रायव्हरने बस पुढे नेली. मात्र, तेव्हा क्लीनरच्या हातातली काठी सटकल्यामुळे वीजेची तार त्याच्या गळ्यात येऊन अडकली. क्लीनर बसच्या छतावर उभा असल्यामुळे वीजप्रवाह संपूर्ण बसमध्ये पसरला. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना वीजेचा झटका बसला. त्यानंतर वीजप्रवाहामुळे बसमध्ये आगही लागली. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखळ झाली आहे. या अपघातामधील सर्व जखमींना जोधपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

बस कडंक्टर आणि ड्रायव्हरचा मृत्यू

या अपघातामधील मृतदेहांना बसच्या बाहेर काढण्यात आलं आहे. मृतांमध्ये बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरचा समावेश आहे. अन्य मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. या अपघातामधील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER