तब्बल सहा दिवसांनी नक्सलवाद्यांकडून विनाअट कोब्रा कमांडोची सुटका

release of the unarmed Cobra Commando - Maharastra Today
release of the unarmed Cobra Commando - Maharastra Today

रायपूर :- छत्तीसगडच्या बिजापूर येथे चकमकीच्या वेळी ३ एप्रिल रोजी अपहरण झालेल्या सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंगला गुरुवारी नक्षलवाद्यांनी मुक्त केले. राकेश्वर सिंहला सोडल्याची बातमी कळताच त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिजापूरच्या जंगलात झालेल्या तुफान चकमकीत २२ जवान शहीद झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी एका जवानाला पकडून ठेवलं होतं. अखेर या जवानाला सुरक्षितरित्या सोडण्यात आलं. आज शेकडो गावकऱ्यांसमोर नक्षलवाद्यांनी जवानाची सुटका केली.

पद्मश्री धर्मपाल सैनी यांच्या उपस्थितीत कोणत्याही विनाअटीशिवाय नक्षलवाद्यांनी जवानाला कोणतीही दुखापत न करता सोडून दिलं. तिथून रवाना झाल्यानंतर जवान राकेश्वर सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल झाले. राकेश्वर सिंह मन्हास हे तब्बल ६ दिवस नक्षलवाद्यांच्या ताब्यात होते. त्यांच्या सुटकेसाठी सरकारकडून दोन सदस्यीय समिती स्थापन केली होती. यामध्ये पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैया यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत जवानाला सोडण्यात आलं.

जवानाच्या सुटकेसाठी दोन सदस्यीय टीमसह ७ पत्रकारांची टीमही उपस्थित होती. मध्यस्थीसाठी ११ जणांचं पथक बस्तरमधील बीहड इथे गेलं होतं. नक्षलावाद्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर जवानाची सुटका करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button