
रत्नागिरी : बदलणारे हवामान, वाढलेला चक्रीवादळाचा धोका व वाढत जाणारे तापमान या दृष्टीने किनारपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने (Central Government) विशेष लक्ष केंद्रित केले आहे. हवामान बदलासाठी (Climate Change) देशभरातील सहा ठिकाणी अभ्यास केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केंद्र सरकार तर्फे हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र उभारण्यात येणार आहे.
कृती योजना देशातील सहा शहरांची रत्नागिरीचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत देशातील सहा राज्यातील सहा शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गुजरातचे पोरबंदर, गोव्याचे पणजी, कर्नाटकचे मंगळुरू, केरळचे कोची, पश्चिम बंगाल किनारपट्टी आदी शहरांचा समावेश आहे. जागतिक बँक आणि राष्ट्रीय निवड करण्यात आली असून यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या महत्त्वाच्या जलविज्ञान हवामान अभ्यास करून, त्याचा अहवाल जागतिक बँकेसमोर ठेवला जाणार आहे. मिळणाच्या निधीच्या माध्यमातून नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी सहा शहरांना सक्षम केले जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला