रा. स्व. संघ प्रमुखांच्या आरक्षणावरील भाष्याने वातावरण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता

Mohan-bhagwat

मुंबई :- ” जे आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि जे विरोधात आहेत त्यांनी या प्रश्नावर एकत्रित चर्चा करायला हवी. मी आधीही आरक्षणाबद्दल बोललो होतो, पण तेव्हा मोठा गदारोळ माजला होता आणि ख-या मुद्दावरून चर्चा भरकटली. पणे जे आरक्षणाच्या बाजूने आहेत त्यांनी विरोध करणा-यांच्या हिताकडे पाहिले पाहिजे तसेच जे विरोध करणारे आहेत त्यांनीही तसेच करावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी आरक्षणावर भाष्य केले
आहे.

यापूर्वी मोहन भागवतांनी आरक्षणावर केलेल्या भाष्यानंतर वातावरण ढवळून निघाले होते. येत्या काही महिन्यात तीन राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघप्रमुखांनी चर्चा छेडल्याने या मुद्दावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. याआधी मोहन भागवतांनी 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणूकीच्या आधीही आरक्षणाबाबत असेच वक्तव्य केले होते. त्यानंतर बिहारमध्ये वातावरण ढवळून निघाले होते. येत्या काही महिन्यांत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीतही विरोधकांनी आरक्षण आणि मोहन भागवतांची भूमिका याबाबत रान उठवल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे आगामी काळात आरक्षणप्रश्नावरून राजकीय क्षेत्रात काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठविल्याबद्दल माहिती नाही : मुख्यमंत्री