जमिनीवर बसून बाजरीची भाकरी खाल्ली कीर्ती कुल्हारीने

Kirti Kulhari

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) सध्या तिच्या कुटुंबीयांसमवेत राजस्थानमध्ये सुटी साजरी करीत आहे. कीर्तीने ‘खिचड़ी – द फिल्म’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. मात्र तिला खरी ओळख २०१६ मध्ये आलेल्या ‘पिंक’ चित्रपटाने मिळाली होती.

गेल्या काही दिवसांपासून ती राजस्थानमध्येच आहे. कीर्ती कुल्हारी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. राजस्थानमध्ये फिरतानाचे विविध फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करीत आहे. यापैकी एका फोटोत ती एका छोट्याशा घरात जमिनीवर बसून बाजरीची भाकरी खाताना दिसत आहे. तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. केवळ फोटोच नव्हे तर तिने जेवतानाचा व्हिडीओही शेअर केला आहे.

फोटोत कीर्तीसोबत तिची मावशीही दिसत आहे. कीर्तीने फोटोला कॅप्शन देताना ‘बजरा रोटी लंच. माझी सगळ्यात मोठी मावशी आणि माझ्या वहिनीने मोठ्या प्रेमाने जेवण बनवले आहे. मी या दोघींच्या शक्ती आणि धैर्याची खूप प्रशंसा करते. त्यांना आणखी शक्ती मिळो. माझ्या गावात फिरताना मला हे सगळे मिळाले आहे. यासोबत कीर्तीने हॅशटॅग राजस्थान, लिहून राजस्थानची यात्रा करण्यासाठी थंडीचे दिवस सगळ्यात चांगला सीझन असल्याचे म्हटले होते. तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले असून तिच्या प्रशंसकांनीही लाईक करतानाच चांगल्या कमेंट्सही दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER