फडणवीसांच्या मागणीनुसारच जलयुक्त शिवार योजनेची चौकशी – एकनाथ खडसे

Eknath Khadse & Devendra Fadnavis

जळगाव : जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. कॅगनं ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे सरकारनं जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्या निर्णयावरच भाजपा नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला हाणला.

याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, जलयुक्त शिवारबाबत अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांनी आधीच स्पष्ट केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनीच मागणी केली होती की, त्यात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार असेल तर चौकशी करा, असं देवेंद्र फडणवीसांनी स्वतःहून सरकारला मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार सरकारनं  याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात गैरव्यवहार झाला असल्यास, कोणी दोषी असल्यास तथ्य बाहेर येईल, असेही एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER