गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

Supriya sule-Ganesh Naik

मुंबई : भाजपचे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी केली.

वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्‌घाटन त्यांच्या पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. नाईक यांनी गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असे वक्तव्य केले होते .

महाराष्ट्रातील एखाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेला याचे उत्तर द्यावे. कारण नागरिकांची सुरक्षा ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे सुळे म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या संसदीय अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. साधारण पंधरवड्यापूर्वी एका सभेत नाईक यांनी या आशयाचे वक्तव्य केले होते. या ठिकाणचे जे नेते ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचा मी प्रिन्सिपल असल्याचे नाईक म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : 2014 मध्ये राष्ट्रवादीचं झालं ते 2019 मध्ये भाजपचं झालं त्यातून सेना वाचली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER