बहिणी बहिणी!

Rituja Jadhav

सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाची जोरदार धामधूम सुरू आहे.अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur),अभिज्ञा भावे, (Abhijna Bhave)शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) यांच्या लग्नाचे व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना पर्यंत पोहोचलेले आहेतच शिवाय ज्यांनी लग्नाचे मुहूर्त निश्चित केले आहेत त्यांच्या घरातही लगीनघाई सुरू झालेली आहे. यामध्ये अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचे लग्न लवकरच होणार आहे तर अभिनेत्री मानसी नाईक देखील याच महिन्यात बोहल्यावर चढणार आहे. एकूणच लग्नाची धामधूम सुरू असतानाच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील माया म्हणजेच रुचिरा जाधव हिला काही दिवसांपूर्वी शुभेच्छा संदेश यायला सुरुवात झाली अर्थात त्या शुभेच्छा होत्या हॅपी मॅरेज लाईफ असे लिहिलेल्या. रुचिराला आलेल्या या शुभेच्छांमुळे एक वेगळाच गमतीदार किस्सा घडला आहे आणि तोच तिने तिच्या सोशल मीडियावर पेजवर शेअर केला.

त्याचं झालं असं की रुचिराची बहीण ऋतुजा हिचा नुकताच साखरपुडा झाला. ऋतुजा आणि रुचिरा दिसायला खूपच सारख्या आहेत त्यामुळेच रुचिराच्या चाहत्यांना कळलं नाही की नेमका साखरपुडा कुणाचा झाला. त्यांना वाटलं की रुचिराचा साखरपुडा झाला आणि म्हणूनच सोशल मीडियावर रुचिराला शुभेच्छा स्वीकाराव्या लागल्या. मात्र रुचिराने त्याचा खुलासा केला आणि ती मी नव्हे तर माझी बहीण ऋतुजा हिचा साखरपुडा झाला आहे असे सांगत तिने या चर्चेला पूर्णविराम दिला.
तुझ्या वाचून करमेना या मालिकेतून रुचिरा जाधव हा चेहरा मराठी इंडस्ट्रीमध्ये दाखल झाला. माझे पती सौभाग्यवती, बे दुणे दहा या मालिकाही रुचिराने केल्या.

अर्थातच सध्या गाजत असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत रुचिरा साकारात असलेले माया हे पात्र तुफान लोकप्रिय होत आहे. गुरुनाथ सुभेदारची सध्याची गर्लफ्रेंड असलेली माया ही तिच्या चाहत्यांना भलतीच आवडत आहे. खरेतर या मालिकेत तिची भूमिका खलनायिका आहे मात्र तरीदेखील तिने तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड असून तिने शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात एकांकिका नाटक या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. लव्ह लफडं, सोबत या दोन सिनेमातही रुचिरा चा अभिनय पाहायला मिळाला होता. बंच ऑफ रोझेस हे नाटक रुचिराने केले आहे. खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली ती माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील माया या भूमिकेतून.

नुकताच तिच्या आयुष्यामध्ये एक गमतीदार प्रसंग घडला. रुचिराची बहिण ऋतुजा हीदेखील मॉडेलिंगमध्ये काम करते. तिने वेगवेगळ्या जाहिरातीदेखील केले आहेत. रुचिरा आणि ऋतुजा यापाठोपाठ च्या बहिणी असल्यामुळे त्या दोघींच्या दिसण्यात खूप साम्य आहे. तीन जानेवारीला ऋतुजाचा साखरपुडा होता. या साखरपुड्याचे फोटो रुचिराने तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले. अचानक रुचिरा चा साखरपुडा झाल्याचे समजून तिच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये रुचिराचेच अभिनंदन केले. जेव्हा रुचिराने कमेंट वाचली तेव्हा तिला नेमका काय गोंधळ झाला आहे हे लक्षात आले आणि तिने त्यासाठी एक खास व्हिडिओदेखील बनवला. या व्हिडिओमध्ये ती म्हणते की साखरपुडा झालेली ती मी नव्हे तर माझी बहीण ऋतुजा आहे. आमच्या दोघींच्या दिसण्यात खूप साम्य असल्यामुळे चाहत्यांना कदाचित माझा साखरपुडा झाला असं वाटणं स्वाभाविक आहे पण साखरपुड्यासाठी सजून-धजून बसलेली मुलगी ही मी नसून माझी बहीण ऋतुजा आहे. एवढे सांगूनही काहीजणांना विश्वास बसेल की नाही याची खात्री नसल्याने रुचिराने तिच्या हातावरच्या मेहंदीचा देखील फोटो शेअर केला आहे. हे पहा मी फक्त इतकीच मेहंदी काढली आहे तर फोटो मध्ये दिसणाऱ्या मुलीच्या कोप-यापर्यंत मेंदी आहे आणि ती माझी बहीण ऋतुजा आहे असे सांगत रुचिराने हा गमतीदार प्रसंग तिच्या चाहत्यांनापर्यंत पोहोचविला आहे. माझा साखरपुडा झाला नाही हे सांगणाऱ्या ऋतुजाला तिच्या चाहत्यांनी मग तुझा साखरपुडा कधी असा प्रश्न विचारून भंडावून सोडले. तेव्हा त्यांना म्हणाली की, नक्कीच मी साखरपुडा, लग्न या सगळ्या गोष्टी करणार आहे मात्र त्याची अजून वेळ यायची आहे. जेव्हा माझा साखरपुडा होईल तेव्हा मी त्याचेही फोटो तुम्हाला शेअर करेन. सहज म्हणून बहिणीच्या साखरपुड्याचे फोटो रूचिराने सोशल मीडिया पेजवर शेअर केले

मात्र या फोटोंनी भलताच गोंधळ घालून ठेवला आणि रुचिराला या सगळ्याचा खुलासा व्हिडिओद्वारे करावा लागला. हे सगळं तिच्यासाठी खूप गमतीशीर आहे. बहिणीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अशा पद्धतीने काहीतरी मजा-मस्ती होईल याचा विचार देखील तिने केला नसेल पण या प्रसंगाकडे तिने खूप खेळीमेळीने पाहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER