वर्कआऊट करताना चुकल्याने टायगर श्रॉफची खिल्ली उडवली बहिण कृष्णाने

Tiger Shroff

टायगर श्रॉफ (Tiger Shroff) नुकताच मालदीव येथे सुट्टी साजरी करण्यासाठी गेला होता. तेथे त्याची प्रेयसी दिशा पटानीही होती. टायगर श्रॉफ आणि दिशा (Disha Patani) चे मालदीवमधील विविध फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आता टायगर मुंबईत परतला असून त्याने लगेचच वर्कआऊट करण्यासही सुरुवात केली आहे. वर्कआउट करतानाचे व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. त्याचे फॅन्सही त्याचे वर्कआउटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर असतात. मुंबईत आल्यानंतर टायगर ने वर्कआउट सुरू केली असून त्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे मात्र या व्हिडिओ एका कीकची प्रॅक्टिस करताना तो तीन वेळा चुकला आणि चौथ्यांदा त्याची कीक बरोबर बसली. या चुकीवर बहीण कृष्णाने त्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

टायगर ने इंस्टाग्राम वर त्याचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे या तो स्पिंनिंग किक मारताना दिसत आहे. किक मारताना आपण तीन वेळा चुकलो याचा रागही त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

या पोस्टवर कमेंट करताना बहिण कृष्णाने त्याची खिल्ली उडवत तो कमकुवत (वीक) झाला आहे अशी कमेंट केली आहे. कृष्णाच्या या कमेंट वर टायगर चा एका फॅनने, तू पण प्रयत्न करून बघ मग कोण वीक आहे ते कळेल असे उत्तर दिले आहे. तर दुसर्‍या एका फॅनने म्हटले की, त्याचा पाय खेचू नकोस. अनुपम खेर चा मुलगा अभिनेता सिकंदर खेरनेही टायगरच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. सिकंदर खेरने मजेत म्हटले आहे, माझी फेवरेट मूव ही ‘चप्पा चप्पा चरखा चले गाण्याची स्टेप आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER