ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज सिराजच्या वडिलांचे निधन

Siraj dad

येत्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले. क्रिकेटपटू म्हणून सिराजच्या यशामध्ये वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

आगामी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये हजर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचे निधन झाले. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे ५३ वर्षांचे होते. त्यांना फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासले होते.

एक क्रिकेटपटू म्हणून सिराजच्या यशामध्ये त्याच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि मर्यादित स्त्रोत असूनही त्यांनी आपल्या मुलाच्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा दर्शविला.

सिराजचा इंडियन प्रीमियर लीग संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB) ट्विट केले आहे की, “वडील गमावलेल्या मोहम्मद सिराज आणि त्याच्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना आणि शोक करतो.” संपूर्ण आरसीबी कुटुंब या कठीण काळात तुमच्यासोबत आहे. मियां, खंबीर राहा.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER