सिराज विमानतळाहून थेट दफनभूमीतच गेला आणि अब्बांना भेटला

Mohammed Siraj

आॕस्ट्रेलियाचे आॕस्ट्रेलियात गर्वहरण करण्यात आणि ब्रिस्बेनचा त्यांचा अभेद्य किल्ला जिंकण्यात मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) काय भूमिका वठवली हे आता सांगण्याची गरज नाही. त्याला झालेली शिवीगाळ, त्यानंतरही त्याने राखलेला संयम, त्याने जीव ओतून केलेली गोलंदाजी हे कुणीच विसरू शकणार नाही पण त्याहूनही एक कितीतरी मोठी गोष्ट, फार मोठा त्याग त्याने केला होता ज्याची तुलनाच होऊ शकत नाही तो म्हणजे आॕस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते, तरी तो मायदेशी परतला नव्हता. संघासोबत आॕस्ट्रेलियातच राहिला होता. आपल्या वडिलांच्या आठवणीने सिडनी मैदानात राष्ट्रगीतावेळी त्याच्या डोळ्यात अश्रुसुध्दा तरळले होते, ब्रिस्बेनला पाच विकेट काढल्यावर त्याने आकाशाकडे पाहत वडिलांची आठवण केली हे आपण सर्वांनी पाहीले कारण रिक्षाचालक असूनही त्याचे वडील, मोहम्मद घौस (Mohammed Ghaus) यांनी त्याच्या खेळण्याला नेहमी समर्थन दिले होते आणि त्यांच्यामुळेच आपण येथवर पोहोचलोय हे तो नेहमीच सांगतो.

असे हे दुःख मोहम्मद सिराजने आज गुरुवारी मोकळे केले.आॕस्ट्रेलियाहून मायदेशी परतताच हैदराबाद विमानतळाहून तो थेट दफनभूमीतच गेला आणि आपल्या अब्बांचे त्याने अंत्यदर्शन घेतले, त्यांच्याशी गप्पा केल्या आणि त्यांना अभिवादन केले. अतिशय भावविवश करणारे हे क्षण होते. त्यानंतर घरी गेल्यावर त्याने अम्मीचे आशीर्वाद घेतले. आईच्या डोळ्याला आपला आॕस्ट्रेलिया जिंकलेला लेक दृष्टीस पडताच त्यांचा अश्रुंचा बांध फूटला आणि त्या ढसाढसा रडल्या.

27 वर्षांच्या मोहम्मद सिराजच्या कारकिर्दीला आकार देणारा हा दौरा त्याच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरला. आयपीएलसाठी युएईमध्ये बराच काळ राहिल्यावर तेथून संघासोबत तो थेट आॕस्ट्रेलियाला गेला. दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलांचे निधन झाले म्हणजे त्याआधीसुध्दा बराच काळ बाप लेकांची भेट झालेली नव्हती तरी त्यांच्या निधनानंतर मोहम्मद सिराजने संघासाठी खेळायला, आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले होते.

मोहम्मद घौस यांचे स्वप्न होते कीआपल्या मुलाने एका दिवशी देशासाठी खेळावे आणि सामना जिंकावा.ही दौन्ही स्वप्ने साकार झाली तेंव्हा दुर्देवाने ते सिराजचा खेळ बघायला हयात नव्हते. आईशी सिराज आॕस्ट्रेलियातुन बोलला तेंव्हा त्या मातेनेसुध्दा मोठ्या हिमतीने, अक्षरशः छातीवर दगड ठेऊन त्याला सांगितले की, तू तिकडेच थांब आणि आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण कर. आणि सिराजने ते स्वप्न पूर्ण केले. 3 सामन्यात त्याने सर्वाधिक 13 विकेट काढल्या. यामुळे इंग्लंडविरुध्दच्या सामन्यांसाठीसुध्दा त्याची संघात निवड झाली.

विमानतळाहुन थेट दफनभूमीत गेल्यावर मी अब्बांशी बोलू तर शकलो नाही पण पुष्पांजली वाहून मी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. 6-7 महिन्यांनी आईला भेटलो. आई माझ्या परतण्याची वाटच बघत होती असे त्याने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER