गायक लकी अलीचा व्हिडिओ वायरल ; गायलं ‘ओ सनम’ गाणं

tw-align-center

मुंबई : मुंबई- बॉलिवूड गायक लकी अली (Lucky Ali) यांच्या आवाजाचे आजही लाखो दिवाने आहेत. लकी अली यांनी अनेक उत्तम गाणी गायली आहेत. सध्या सोशल मीडियावर लकी अली यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ते स्वतःचं एक प्रसिद्ध गाणं गाताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ते ‘ओ सनम’ हे सुपर हिट गाणंं गाताना आणि गिटारवर वाजवताना दिसत आहेत. गाणे आणि गिटारही वाजवत आहे. लाइव्ह शोमधला हा व्हिडिओ असल्याचे अनेकांचे म्हणने आहे. त्यांचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. अनेक चाहते सोशल मीडियावर या व्हिडिओवर भरभरून कमेन्टही करत आहेत.

लकी अली फक्त गायकच नाही तर लेखक आणि संगीतकार आहेत. गायक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात ‘दुश्मन दुनिया का’ या चित्रपटातील ‘नशा नशा’ या गाण्याने केली. लकी अली यांनी ‘एक पल का जीना’, ‘ना तुम जानो ना हम’, ‘आ भी जा’, ‘हैरात’ आणि ‘सफरनामा’ अशी उत्कृष्ट गाणी गायली आहेत.

लकी अलीच्या नावाने प्रसिद्ध मकसूद महमूद अली हे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता, गायक, निर्माता-दिग्दर्शक मेहमूद अली यांचे सुपूत्र आहेत. लकी अली यांची आई लोकप्रिय अभिनेत्री मीना कुमारीची बहीण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER