प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्यचे निधन

Anuradha Paudwal - Aditya Paudwal

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड आणि भजन गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांचा मुलगा आदित्य याचं निधन झालं. तो ३५ वर्षांचा होता. किडनी निकामी झाल्याने आदित्यचं निधन झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला.आदित्यही आई-वडिलांप्रमाणे संगीत क्षेत्रात कार्यरत होता. म्युझिक अरेंजर, संगीतकार म्हणून आदित्यने संगीत विश्वात ओळख निर्माण केली होती.

शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटातील ‘साहेब तू… ’ या गाण्याचा प्रोड्युसर म्हणूनही त्याने काम बघितले होते. मागील काही दिवसांपासून आदित्य किडनीच्या आजाराने ग्रस्त होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याने जगाचा निरोप घेतला. आदित्यच्या पश्चात आई अनुराधा आणि गायिका बहीण कविता पौडवाल असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER