सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री घोषित

Sindhutai Sapkaal-Girish Prabhu

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा यात समावेश आहे. सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) आणि गिरीश प्रभुणे (Girish Prabhu) यांना सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंधुताई या विदर्भातील आहेत.

नामदेव कांबळे यांना साहित्याबद्दल, कला क्षेत्रातील परशुराम गंगावणे आणि उद्योक्ष श्रेत्रासाठी रजनीकांत श्रॉफ यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.

कला क्षेत्रात एस. पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू, पुरातत्व तज्ज्ञ बी. बी. लाल यांना पद्म विभूषण पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्म पुरस्कारांमध्ये १० जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांचा समावेश आहे. सरकारने ७ जणांना पद्मविभूषण जाहीर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER