सिंधुदुर्गात राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधले घड्याळ

NCP & BJP

सिंधुदुर्ग : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासुन राष्ट्रवादी काँग्रेसला सुगीची दिवस आले आहेत. तर दुसरीकडे भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहे. आगामीनिवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीत मोठ्याप्रमाणात इनकमिंगला सुरूवात झाली आहे. अनेक राजकीय नेते, आमदार, कार्यकर्ते महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दाखल होत आहेत. आज सिंधुदुर्गातील प्रसिद्ध विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रथम तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे अनेक नेत्यांची राष्ट्रवादीकडे ओढ लागल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्गात राष्ट्रवादी पक्षाने भाजपसह इतर राजकीय पक्षांना चांगलाच दणका दिला आहे. कणकवली जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले. हा प्रवेश कार्यक्रम कणकवली-कलमठ येथे संपन्न झाला. कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध तरुण विधितज्ञ प्राजक्ता शिंदे यांच्यासह भाजपा आणि अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक काका कुडाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी कणकवलीतील प्रसिध्द विधितज्ञ ऍड. प्राजक्ता शिंदे, कलमठ येथील अन्वर सुमार साठी, मुख्याध्यापक अनिता फर्नांडिस, साक्षी तर्फे, राजश्री शिंदे ,सुरेखा सावंत, गायत्री शिंदे , रामचंद्र तर्फे, समृद्धी तर्फे, संदीप बोबाटे, प्रवीण कदम, अर्चना विश्वेकर ,सारिका सावंत, मनीषा सावंत, ज्योती साटम इत्यादी कार्यकर्त्यांनी मनगटावर घड्याळ बांधले. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER