वैभव नाईकांचा नितेश राणेंना धक्का; अमोल राणे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन

Maharashtra Today

मुंबई : कणकवलीत शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का दिला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली गावात भाजपचे सरपंच काका राणे, अमोल राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला .जानवली गावचे सरपंच काका राणे, अमोल राणे यांच्यासह रजत राणे, राजेश परब, पांडुरंग मेस्त्री या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवबंधन बांधून या सर्वांचे पक्षात स्वागत केले.सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपमध्ये अनेकदा वादंग पेटले आहे . सेना-भाजपमधील नेते-कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारताना पाहायला मिळत आहे. कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश केला होता. त्यामुळे कुडाळ पंचायत समितीत भाजपची सत्ता आली.

शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात शिवसेनेला धक्का देत राणेंनी कुडाळच्या सभापतींना भाजपात आणलं होतं. तर दुसरीकडे अवघ्या तीन दिवसांत वैभव नाईक यांनी वचपा काढला होता. कट्टर राणे समर्थक पंचायत समिती सदस्याला शिवसेनेत प्रवेश देत नाईकांनी राणेंवर पलटवार केला होता. कट्टर राणे समर्थक असलेल्या कुडाळ पंचायत समिती सदस्य नीलिमा वालावलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button