सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपले

Sindhudurg - Heavy Rains

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याला सलग तिसर्‍या दिवशीही मुसळधार पावसाने (Heavy Rain) झोडपून काढले. काही ठिकाणी ढग फुटीसदृश स्थिती होती. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तर वेंगुर्ला तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसले आहे. गेल्या चोवीस तासांत वेंगुर्ला तालुक्यात 264.40 मिमी तर मालवण तालुक्यात 254 मिमी पाऊस पडला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 137.92 च्या सरासरीने 1103.40 मी मी पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसाचे पाणी हातातोंडाशी आलेल्या शेतीत जात असल्याने तसेच सतत पाऊस पडत असल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. बुधवारी तिसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस पडत होता. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले होते. तर काही ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्याने तेथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नदी आणि ओहळाच्या नजीकच्या परिसरात पावसाचे पाणी काही ठिकाणी घरात शिरले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER