सिंधू म्हणते, गोपीचंद हे माझ्या बऱ्याच प्रशिक्षकांपैकी एक!

PV Sindhu - PV Gopichand - Maharashtra Today

भारताची विश्वविजेती बॕडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (P.V.Sindhu) हिच्या जडणघडणीत पी.गोपीचंद (P.Gopichand) यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे समजले जात असले तरी या दोघांतील मतभेद आता ह्या थराला गेले आहेत की सिंधू तसे मानायला तयार नाही. ती म्हणते की, दक्षिण कोरियाचे पार्क ते सांग (Park Tae Sang) हे आपले प्रशिक्षक आहे आणि गोपीचंद हे आतापर्यंत असलेल्या माझ्या बऱ्याच प्रशिक्षकांपैकी एक आहेत. त्यामुळे गोपीचंद यांची कमतरता आपल्याला काही जाणवत नाही. 2016 च्या रियो आॕलिम्पिकपर्यंत सिंधू व गोपीचंद हे सोबतच होते.

सध्या ती 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या टोकियो आॕलिम्पिकच्या तयारीला लागली आहे आणि टोकियोत पदक जिंकायचे लक्ष्य तिने बाळगले आहे. त्यासाठी दक्षिण कोरियन प्रशिक्षक पार्क ते सांग आणि ट्रेनर सुचित्रा यांच्या मार्गदर्शनात तिची तयारी सुरु आहे.

ती म्हणते, ‘मला वाटते माझी तयारी झाली आहे आणि टोकियोत गोपीचंद यांची उणिव मला जाणवणार नाही. पार्क व सुचित्रासोबत दररोज पाच ते सहा तास माझा सरावसुरू आहे, गेल्यावर्षी ऐनवेळी आॕलिम्पिक सामने रद्द झाले होते पण आता ते वेळेवर होतील अशी चिन्ह आहेत. पण खेळांपेक्षा जीवं वाचवणे महत्त्वाचे होते कारण आयुष्य राहिले तरच खेळ होतील.’

टोकियो आॕलिम्पिकसाठी महिला एकेरीत पात्र ठरलेली सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्यामुळे आपल्यावर फार मोठी कामगिरी असल्याचे ती मानते. ‘निश्चितपणे लोकांच्या अपेक्षा असतील, त्या काहीही असू देत, मला माझी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल’, असे ती म्हणते.

पार्क ते सांग यांच्यासोबत ती गेल्या वर्षभरापासून तयारी करतेय. त्यांनी लक्ष घातल्याने बराच फरक पडलाय. गोपीचंद अॕकेडमीहून गाचीबौली स्टेडियमकडे आल्यापासून माझी तयारीअतिशय चांगली होत असून वेळ सदूपयोगी लागत आहे असे सिंधूने म्हटले आहे.

2020-21 मध्ये सिंधू आठ स्पर्धात खेळली. आॕल इंग्लंडच्या ती उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली. स्वीस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली. पण एकही स्पर्धा तिला जिंकता आली नाही आणि जानेवारीत थायलंड ओपनमध्ये तर ती पहिल्याच फेरीत बाद झाली होती.मात्र तरीसुध्दा पार्क ते सांग यांच्यासोबत आपली तयारी चांगली झाली असल्याचा सिंधूचा दावा आहे.

ती म्हणते की, तुम्ही अपयशी ठरता तेंव्हा साहजिकच वाईट वाटते. तुम्ही आत्मपरिक्षण करता पण कधीकधी चांगले खेळूनही अपयश पदरी पडते.तो दिवस तुमचा नसतो. कॕरोलिन मारिन वा ताई ते झू यांना मी हरवू शकतनाही असे नाही पण दोन चार गुणांच्यावेळी चूक होते. हे खराब दिवस कमी कसे येतील आणि खराब दिवशीसुध्दा कामगिरी चांगली कशी होईल हे बघायला हवे.

आपल्या विश्वविजयी आणि आॕलिम्पिक रौप्यपदक विजेत्या कारकिर्दीसाठी तिने आपल्या आतापर्यंतच्या सर्व प्रशिक्षकांना धन्यवाद दिले आहेत. त्यांचे आभार मानताना तिने म्हटलेय की, मेहबूब अलींपासून पार्क यांच्यापर्यंत तिच्याआयुष्यात बरेच प्रशिक्षक आले. गोपीचंद हा त्यातील एक टप्पा होता पण तो भूतकाळ होता. प्रत्येकाची तुलना मी एकाच पातळीवरुन करते. बदल हा आवश्यक असतो आणि खेळाडूंनी नेहमी वर्तमानात रहायला हवे. वेगवेगळ्या प्रशिक्षकांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यातील चांगले जे असेल ते खेळाडूने घ्यायचे असते. 2016 पर्यंत गोपीचंद माझ्यासोबत होते. नंतर इंडोनेशियाचे मुल्यो हांद्यो होते, त्यानंतसृ कोरियाचे किम जी ह्यून होते. किम हे अतिशय अॕक्टिव्ह होते आणि विश्वविजेतेपदावेळी ते माझ्यासोबत होते. त्यानंतर आता पार्क आहेत आणि टोकियोतही ते माझ्यासोबत असतील. त्यामुळे गोपी सरांची कमतरता जाणवत नाही.

पार्क यांच्यासोबत आपले सामंजस्य चांगले आहे. माझ्या मनात काय चालेलेय हे त्यांना कळते.मी दडपणात असते किंवा अडचणित असते तेंव्हा ते मला माझ्या पध्दतीने विचार करू देतात. त्यांचा डोळ्यांतून समन्वय कमाल आहे. केंव्हा लक्ष घालायचे हे त्यांना चांगलै समजते आणि माझ्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल त्यांची निरिक्षणे फार महत्त्वाची असतात, असे सिंधू हीने पार्क ह्यांच्या कौतुकात म्हटले आहे.,

आपल्या यशासाठी कुण्या एका विशिष्ट व्यक्तीला श्रेय देणे चुकीचे आहे असे ती गोपीचंद यांच्याबद्दल म्हणाली. ती म्हणाली की, माझे वडील रामणा यांचे मला नेहमीच भक्कम पाठबळ लाभले. ते माझ्या कारकिर्दीतील अदृश्य प्रशिक्षक आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हाॕलीबॉल खेळलेले असल्याने त्यांच्याकडेही अनुभव आहे आणि त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी करुन बघण्यात काहीच चुकीचे नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button