‘सिंधूदेश’च्या मागणीसाठी मोर्चा, मोदींसह जगातील प्रमुख नेत्यांचे झळकले फलक

सान : पाकिस्तानातील सिंध प्रांतात स्वतंत्र ‘सिंधू राष्ट्रा’ची मागणी जोर धरु लागली आहे. रविवारी सान शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे मोर्चात निदर्शकांनी पाठिंब्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासह जगातील काही प्रमुख नेत्यांचे फलक हातात घेतले होते.

निदर्शकांनी मोदींसह जगातील प्रमुख नेत्यांना – आमच्या स्वातंत्र्य लढ्यात हस्तक्षेप करा, अशी मागणी केली. निदर्शक या नेत्यांच्या फोटोचे फलक घेऊन आले होते. आंतरराष्ट्रीय समुदयाने आमच्या स्वातंत्र्य लढ्यात हस्तक्षेप करावा अशी त्यांची मागणी होती. स्वतंत्र सिंधू राष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या.


स्वतंत्र बलुचिस्तानचीही मागणी

दरम्यान, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या बळकावलेल्या गिलगिट बाल्टिस्तान या भागातील बलुचिस्तानमध्येही गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यासाठी लढा देणारे कार्यकर्ते पाकिस्तानी सरकारच्या कारवाईच्या भीतीने लंडनसह इतर देशांमधून आपल्या मागण्या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्यांविरोधात पाकिस्तानी सरकार दडपशाही करते. अनेकदा इथल्या नागरिकांचे मानवी हक्क पायदळी तुडवले जात असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. भारतानेही या दडपशाहीविरोधात संयुक्त राष्ट्रात आवाज उठवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER