महाराष्ट्रात लॉकडाऊन कधीपासून? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

Rajesh Tope - Maharashtra Lockdown

जालना :- लॉकडाऊनसाठी मानसिकता तयार ठेवा. राज्यात लॉकडाऊन आधी जनतेला पूर्व सूचना देण्यात येईल. जनतेला महत्वाच्या कामांसाठी पूर्ण वेळ देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज दिली. महाराष्ट्राला दररोज ६ लाख लसी मिळाल्या तरच लसीकरणाचा वेग वाढवता येईल असेही स्पष्टीकरण टोपे यांनी दिले. म्हणाले. जालन्यात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता संभाव्य लॉकडाऊनबाबत ही माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले की, विद्युत शव दाहिनी प्रत्येक जिल्ह्यात निर्माण करण्याबरोबरच ऑक्सिजन प्लांट तातडीने उभारणे, रेमडिसीवीर वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येण्याबाबत निंर्णय झाला आहे. लसीं मिळत नाही याची आम्हाला खंत आहे. यापुढे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट तयार होणार असून त्यातूनच ऑक्सिजनची गरज भागवली जाईल असंही त्यांनी सांगितलं. 10 वी आणि 12 वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जीव वाचवण्यासाठी असे निंर्णय घ्यावे लागतात असं सांगत त्यांनी या निंर्णयाच स्वागत केलं.

लॉकडाऊन काळात गोरगरीब नागरीकांना मदत करण्यासाठी चर्चा झाली असून मुख्यमंत्री याबाबतीत अंतिम निंर्णय घेतील असंही टोपे यांनी सांगितलं. पुढील दोन दिवस अर्थ तसंच इतर विभागांशी मुख्यमंत्री चर्चा करतील. बुधवारी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्याची शक्यता आहे. एकदा हे सर्व झालं ती १४ एप्रिलपर्यंत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील, सध्या अनेक जिल्ह्यात बेडची कमतरता असून याबाबतीत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना बेडस, ऑक्सिजन बेड्स वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यापुढे कमतरता असल्याची सबब चालणार नाही असा इशाराही टोपे यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button