कोणावरही विश्वास नाही, आता पवारांनीच समाजाला न्याय द्यावा – मराठा क्रांती ठोक मोर्चा

शरद पवार - मराठा क्रांती ठोक मोर्चा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता मराठा समाज (Maratha Community) अधिकच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चाने (Maratha Kranti Thok Morcha) मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ही समिती बरखास्त करून या समितीत नव्या सदस्यांचा समावेश करावा, अशी मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. तसेच आता राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यात तीन पक्षाचं सरकार बनवण्यात लक्ष घातलं. आता त्यांनीच पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर आम्हाला विश्वास उरलेला नाही, असंही मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी सांगितले.

यावेळी आबा पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण उपसमितीचा मराठा समाजालाकुठलाही लाभ झालेला नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करून नव्या सदस्यांचा समितीत समावेश करावा. काम करणाऱ्यांनाच समितीत संधी देण्यात यावी. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार गंभीर नाही. कोणत्याही मागणीवर आणि विषयावर सरकार गंभीर नाही. मुळात भूमिका घेण्यातच सरकार अपयशी ठरलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले. राज्यात ७२ हजार जागांसाठी मेगा भरती झाली. पण मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून ही भरती थांबवण्यात आली होती. पण आता सहा हजार नियुक्त्या करण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप करतानाच ही निवड प्रक्रिया थांबवण्यात यावी, अन्यथा मेट्रो कार्यालयात घुसून ही प्रक्रिया बंद पाडल्या जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER