सरपंचासाठी आरक्षित प्रवर्गातील व्यक्ती निर्वाचित सदस्यात नसल्याने काही ग्रा. पं. अडचणीत

GramPanchayat

सांगली : नुकत्याच राज्यात ग्रामपंचायत निवडणूका (Gram Panchayat Elections) पार पडल्या. निकालानंतर उत्सुकता सरपंचपदासाठी घोषित होणाऱ्या आरक्षणाबाबत होती. सांगली (Sangli) जिल्ह्यातील काही मोजक्या गावात सरपंचपदाच्या पडलेल्या आरक्षणावरून पेच निर्माण झाला आहे. कारण, तिथे सरपंच पदासाठी आरक्षित जातीचा सदस्यच निवडून आला नाही. या गावच्या सरपंचपदाचे आरक्षण बदलण्यात यावे अशी मागणी होते आहे.

कडेगाव तालुक्यातील अंबक ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती स्त्री साठी निघाले. मात्र या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षणात एकही जागा नव्हती. त्यामुळे विजयी उमेदवारात या प्रर्वगातील एकही महिला सदस्य नाही.

अंबक ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपामध्ये सामना झाला. काँग्रेसने १० तर भाजपाने १ जागा जिंकली. मात्र, विजयी उमेदवारात सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्र,अनुसुचित जाती या प्रवर्गातील उमेदवार आहेत. आरक्षण सोडत झाल्यानंतर या सर्वांचीच निराशा झाली. अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने आता सरपंचपद रिक्त राहणार आहे. उपसरपंच पदाची निवडही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली बोलविलेल्या विशेष बैठकीत केली जाते. यामुळे आता उपसरपंच निवड कशी होणार याबाबतही उत्सुकता आहे.

आरक्षणाची सोडत निवडणुकीनंतर काढल्याने गोंधळ

सरपंच आरक्षण सोडत निवडणुकीपूर्वी झाली असती तर हा गोंधळ झाला नसता. नेते म्हणतात, निवडणुकीआधी सोडत निघाली असती तर आम्ही नियमानुसार योग्य त्या जागेवर अनुसूचित जाती स्त्री उमेदवार निवडून आणला असता. निवडणुकीनंतर आरक्षण सोडत घेतल्याचा हा परिणाम आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. यामुळे जे सरपंच पदासाठी इच्छुक होते, त्यांची देखील निराशा झालीय.

तासगाव तालुक्यातील गौरगाव ग्रामपंचायतीतही असाच प्रकार झाला आहे. नवीन आरक्षण काढू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, असे कळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER