शासनाकडून वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी निधी मिळत नसल्याने तरूण चढला टॉवरवर

खा. इम्तियाज जलील यांच्या आश्वासनानंतर दोन तासांनी उतरला तरूण खाली

77232ab1-a22c-4fe3-9f88-cd509d5e6ca3 (1)

सहा महिन्यांपासून प्रयत्न करूनही शासनाकडून वडिलांच्या लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी निधी मिळत नसल्याने आत्महत्या करण्यासाठी टि व्ही सेंटर येथील दुरदर्शनच्या टॉवरवर चढलेला तरूण खा. इम्तियाज जलील यांनी आश्वासन दिल्यावर दोन तासांनी खाली उतरला. मंगेश संजय साबळे (२३, रा. गेवराई पायगा, ता. फुलंब्री) असे या तरूणाचे नाव आहे. वडिलांच्या लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेसाठी सुमारे २५ ते ३० लाख रूपये खर्च डॉक्टरांनी सांगितला.

ही बातमी पण वाचा : गुन्हेशाखेकडून गावठी बनावटी चे पिस्टल जप्त

अल्पभुधारक शेतकरी असल्याने मंगेशला एवढी रक्कम जमा करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून वडिलांच्या शस्त्रक्रियेकरता पैसे मिळावेत यासाठी अर्ज केला. तसेच स्थानिक प्रतिनिाधींची भेट घेऊन शासनाकडून तातडीने मदत मिळवून द्या अशी विनंती केली. मात्र सहा महिन्यांपासून शासनाकडून मदत मिळाली नाही. परिणामी मंगेशच्या वडिलांची प्रकृती अधिक नाजूक होत आहे. त्यामुळे १३ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याने उपोषण सुरू केले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त मंगेश बुधवार(दि. १८) दुपारी बारा वाजे दरम्यान टी व्ही सेंटर येथील दूरदर्शन च्या टॉवरवर चढून आत्महत्या करणार असल्याची पत्रके फेकली. याबाबत माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली.

लोकांनी आवाहन करून देखील तो खाली उतरत नव्हता. खा. इम्तियाज जलील यांनी त्याला पूर्ण मदतीचे आश्वासन देत खाली उतरण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगेश तब्बल दोन तासांनंतर खाली उतरला. यानंतर सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी त्याची समजूत काढली. यावेळी उपस्थितांनी तातडीने त्याला २ लाख ३१ हजारांची रोख मदत केली.