आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांना असह्य झालं; अजितदादांचा चंद्रकांतदादांना टोला

Chandrakant Patil - Ajit Pawar

बारामती : महाविकास आघाडी सरकारला १८ महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोक झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar )यांनी जोरदार टोला हाणला आहे. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakantdada Patil) यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा प्रश्न अजितदादांनी उपस्थित केला. ते शनिवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं, तेव्हापासून भाजप नेत्यांना असह्य झालं आहे.

आपण सत्तेत नाही हे सतत बोचत असतं. कार्यकर्त्यांनी सोबत राहावं यासाठी काही ना काही बोलत राहतात. जोपर्यंत तिन्ही पक्षांचे नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत सरकार टिकून राहणार, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button