उर्वरीत सर्व टप्प्यांसाठी एकाच वेळी मतदान घेण्यात यावे; बॅनर्जींची EC कडे मागणी

Mamata Banerjee

कोलकाता :- एकीकडे देशात कोरोनाचा (Corona) संसर्ग वेगाने वाढत आहे, तर दूसरीकडे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणूक प्रचार सभेत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उर्वरीत सर्व टप्प्यांसाठी एकाच वेळी मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार सभेत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. प्रचारसभेदरम्यान गर्दी केली जात आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी आरिज आफताब यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत निवळणूक संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आयोगाने सर्व राज्य आणि राष्ट्रीय राजकीय पक्षांना एकच प्रतिनिधी हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

या बैठकीत निवडणुकीच्या उर्वरीत टप्प्यांबाबत सर्व राजकीय पक्षांकडून त्यांचे मत जाणून घेतले आहे. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ४ टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. मात्र, चौथ्या टप्प्यात हिंसाचार झाला होता. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. यावरून तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोग आणि सुरक्षा दलांवर आरोप केला. तर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची बंदी घातली आहे. दिलीप घोष यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही प्रचारबंदी लागू असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button