एकाच वेळी ३५० शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश, अमित ठाकरे म्हणाले ‘ ‘ये तो सिर्फ ट्रेलर है’

Maharashtra Today

मुंबई : राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही मुंबईतल्या एका उपनगरात गुरूवारी शिवसेनेच्या तब्बल ३५० पदाधिकाऱ्यांनी (350 Shiv Sainiks in MNS) पक्षाला रामराम ठोकत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आपल्या हाती घेत प्रवेश केला. या शिवसैनिकांना मनसेत घेण्यामागे राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचे नियोजन असल्याचं सांगितलं जात आहे. भांडूप, विक्रोळी, मुलुंड परिसरात पक्षवाढीसाठी अमित ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून विशेष लक्ष घातलं होतं. त्याचे फळ काल मनसेला मिळाले. भांडूप परिसरातील काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला. यामध्ये विभाग क्रमांक १०९ चे शिवसेनेचे शाखाप्रमुख यांचा समावेश आहे.

या प्रवेशाबद्दल अमित ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी मनसेत मोठे इन्कमिंगचे संकेत दिले. “ये तो सिर्फ ट्रेलर है”, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली. याच भागातील इतर पदाधिकारी सुद्धा येत्या काळात मनसेत प्रवेश करतील. केवळ भांडुपचा नाही तर विक्रोळी आणि मुलुंड परिसरातले विविध पक्षाचे पदाधिकारी येत्या काळात मनसेत प्रवेश करतील, असा दावा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात मधील अनेक गुजराती बांधव, विक्रोळी परिसरातील मराठी बांधव मनसेत प्रवेश करताना दिसतील. या भागात शिवसेनेला खिंडार पडेल, असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही सांगितलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे सध्या पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना राजकीय जीवनाला सुरुवात करून अवघी काही वर्ष झालेली आहे. त्यात पक्षाचे नेतेपद घेऊन केवळ दीड वर्ष झालं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे.‌ अमित ठाकरेंसोबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे या लोकसभा क्षेत्रात कामकाज पहात आहेत.

या दोघांनी मिळून भांडुप, विक्रोळी णि मुलुंड परिसरात तब्बल 36 बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये अमित ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पक्षवाढीतल्या अडचणी, त्याला जबाबदार असणारी कारणं, पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला बेबनाव, एकमेकांबरोबर असलेली चढाओढ या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली. प्रत्येक पदाधिकाऱ्याची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सोबतच महानगरपालिकेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी पात्र उमेदवारांची चाचपणी सुद्धा या बैठकांना मार्फत केली आहे.

स्वतः अमित ठाकरे प्रत्येक बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत असल्यामुळे या भागात पदाधिकाऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. याच पार्श्वभूमीवर भांडूप परिसरातील काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला. यामध्ये विभाग क्रमांक 109 चे शिवसेनेचे शाखाप्रमुख यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे सध्या राज्यात शिवसेनेच सरकार आहेत. मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच आहे. त्यामुळे सरकार असलेल्या पक्षाकडे लोकांचा ओघ वाढत असतो. परंतु इथे मात्र शिवसेनेचे पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचे उघड होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER