सांगलीत साध्या पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक

immersion of Ganesha in Sangli

सांगली : सर्वाधिक काळ चालणारी अशी ख्याती असलेली मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesha immersion procession) कोणत्याही वाद्याचा दणदणाट आणि स्वागत कमानीशिवाय साधेपणाने अवघ्या १० तासांत संपली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona Crises) यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) सर्व मंडळाकडून साधेपणाने साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मिरजेत अडीचशे मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आले. मिरजेतील गणेशोत्सव हा उंच आणि मोठ्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.

तसेच विसर्जन मार्गावर उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानींसाठी विशेष प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या वर्षी महापुरामुळे आणि या वर्षी कोरोना संसर्गामुळे विसर्जन मार्गावरील स्वागत कमानी रद्द करण्यात आल्या. तसेच गणेशोत्सवदेखील साधेपणाने साजरा करावा यासाठी उंच मूर्ती बसवण्यास शासनाने प्रतिबंध केला होता. त्यामुळे मिरजेतील सर्व मंडळांकडून लहान गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मिरज शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे येथील सर्व मंडळांच्या श्री मूर्तीचे सायंकाळी ६ वाजेपर्यंत विसर्जन करावे, असे पोलीस उपअधीक्षक संदीप सिंह गील यांनी केलेल्या आवाहनाला गणेश मंडळांनीदेखील प्रतिसाद दिला. सकाळी ७.३० वाजता गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनास सुरुवात झाली होती. सायंकाळी ६.३० वाजता शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER