हालेप प्रथमच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत

Halep in final

सर्वोच्च क्रमांकाची खेळाडू सिमोना हालेप हिने आठव्या मानांकित एलिना स्विटोलिना हिला सरळ सेटमध्ये पराभूत करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. हालेप प्रथमच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहचली असून पाचव्यांदा तिने ग्रँड स्लॕमची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य सामना हालेपने 6-1, 6-3 असा फक्त 72 मिनिटात जिंकला.

हा विलक्षण अनुभव आहे. मी आनंदीत आहे. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी हा एक आहे म्हणून मी त्याचा अधिकाधिक आनंद घेण्याचा प्रयत्न करतेय, असे हालेपने म्हटले आहे.

सातवे मानांकन मिळालेली हालेप 2014 नंतर प्रथमच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत खेळली तर स्वितोलिना पहिल्यांदाच उपांत्य फेरीत खेळली.

हा सामना एकतर्फी वाटत असला तरी प्रत्यक्षात सामना तेवढा एकतर्फी नव्हता. प्रत्येक गेम संघर्षमय झाला. हालेपने सात पैकी चार ब्रेकपॉईंटचा फायदा उचलला. आता विजेतेपदासाठी हालेपला दिग्गज सेरेना विल्यम्स आणि बार्बरा स्ट्रायकोव्हा यांच्यातील विजेतीचा सामना करायचा आहे.

ही बातमी पण वाचा : धोनी, निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस; लता मंगेशकर यांचा आग्रह