जन्म आणि मृत्यूचे दाखल्यासाठी कोल्हापुरात अशीही सक्ती : नागरिकांतून संताप

Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : जन्म आणि मृत्यूचे दाखले देण्यापूर्वी घरफाळा भरण्याची सक्ती महापालिकेने सुरु केल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. ई गर्व्हनसच्या कार्यालयात नागरिक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांत वादावादी घडत आहे. दाखला मागणारे नागरिक हे भाड्याच्या घरात राहात आहेत, त्यांच्याकडे घरफाळ्याची पावती नाही, अथवा घरमालकांचे घरफाळे थकित आहेत, अशावेळी दोष नसताना नागरिकांची अडवणूक केली जात आहे. जन्म आणि मृत्यूचे दाखल्यासह अनेक महत्वाच्या कामासाठी कागदपत्रे लागत असताना अशा स्थितीत महापालिकेने अडवणूक करणे अयोग्य असल्याचे अनेक नागरिकांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, दाखले देताना अशा प्रकारची सक्ती नको, अन्यथा आंदोलन उभे राहील, असा इशारा अनेक सामाजिक संघटनानी निवेदनाव्दारे दिला आहे.

महापालिकेतर्फे जन्म आणि मृत्यूचे दाखले दिले जातात. पण 10 डिसेंबरला सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी एक आदेश काढून शहरातील स्थानिक नागरिकांने घरफाळा भरला नसेल तर जन्म मृत्यूच्या दाखल्याचा अर्ज स्विकारु नये, असे म्हटले आहे. घरफाळा भरल्याचा ना हरकत दाखला असल्याशिवाय जन्म मृत्यूचा दाखला देउ नये, असे या आदेशात म्हटले आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी ज्या विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या उपाययोजनांचा भाग म्हणून दाखले देताना अशाप्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरु केल्यानंतर नागरी आरोग्य सुविधा केंद्रात नागरिक आणि कर्मचारी, अधिकारी याच्यात वादावादीचे प्रसंग घडत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER