४२० दशलक्ष वर्षांपूर्वी नामशेष झालेला ‘सिलाकँथ मासा’ आढळला जिवंत

fossil fish - Maharashtra Today

‘सिलाकँथ’ या प्रजातीचे मासे डायनॉसॉरची शिकार करत असल्याचे मानले जाते. असे मानले जात की, ही प्रजाती लाखो वर्षांपूर्वी नामशेष झाली होती. मात्र आता या प्रजातीतील मासा मादागास्करच्या किनाऱ्याजवळ वेस्ट इंडियन महासागरात जिवंत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सिलाकँथ’ प्रजातीचा हा मासा दक्षिण आफ्रिकेच्या असलेल्या शार्क माशाची शिकार करणाऱ्या एका पथकाने अचानकच शोध लावला आहे.

मोंगाबे वृत्तानुसार, शार्क माशाची शिकार करण्यासाठी आलेल्या या पथकाने आपल्या कामासाठी ‘जिलनेट्स’ (Gillnets) म्हणजेच उभी जाळी वापरली होती. ही जाळी शार्कची शिकार करण्यासाठी वापरली जाते. ‘सिलाकँथ’ या प्रजाती जिथे आढळतात, त्या समुद्रात खोलवर जाणारी ही जाळी पाण्याच्या पृष्ठभागाखाली ३२८ ते ४९२ फुटांपर्यंत पोहचते.

१९३८ नंतर दिसला या प्रजातीचा मासा
‘सिलाकँथ’ प्रजाती ही डायनॉसॉरची शिकार करणारी प्रजाती लाखो वर्षांपूर्वी नामशेष झाल्याचे मानले जात होते. मात्र, १९३८ साली ही प्रजाती पुन्हा एकदा आढळली होती. तेव्हापासून या प्रजातीतील मासा जिवंत आढळल्याची ही पहिलीच घटना समोर आली. पुन्हा हा मासा दिसणे हा जैवशास्त्रज्ञांसाठी एक धक्काच आहे. याला आठ कल्ले, मोठे शरीर आणि खवल्यांवर एक विशिष्ट रचना आहे. आता या प्रजातीच्या रक्षणासाठी नव्याने पावले उचलण्याची मागणी सागरी जीवसृष्टीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button