मनसेत फेरबदलाचे संकेत : आज बैठक, तर राज ठाकरे लवकरच नाशिक दौऱ्यावर

Raj Thackeray

नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग धरला आहे. अशातच आज मनसेचे ५० पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत. त्यांची राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मनसे शहर आणि जिल्हा कार्यकारिणीत नव्या वर्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही तातडीनं  बैठक घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. या बैठकीत महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर आता राज ठाकरे हे लवकरच नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यासंबंधी नाशिकचे मनसे सचिव पराग शिंत्रे यांनी माहिती दिली आहे.

त्यामुळे मनसेच्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातही मोठा अटीतटीचा सामना असणार आहे. मुंबई पालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत हा गड भाजप जिंकणार, असे थेट आव्हान भाजपच्या बड्या नेत्यांकडून देण्यात आले आहे. तर शिवसेनेचा भगवा झेंडा कायम राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांची राज ठाकरेंना साद, म्हणाले ‘मराठी माणसाबद्दलची त्यांची भूमिका आम्हाला मान्य’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER