कंगना रनौतचे राजकारणात उतरण्याचे संकेत

Kangana Ranaut

सुशांतचा (Sushant Singh Rajput) मृत्यू ते बॉलिवुडमधील (Bollywood) अंमली पदार्थ आणि शेतकरी मोर्च्यार्यंत विविध मुद्द्यांवर कंगनाने अनेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ती सतत कोणता ना कोणता वाद निर्माण करीत असते. चालू घडामोडींवर मत व्यक्त करून तिच्या विरोधकांना ती आयते कोलीत देते. मुंबईत राहूनही कंगनाने शिवसेनेला आव्हान दिले त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) नेत्यांना काही सुचेनासे झाले आहे. त्यामुळेच तिच्यावर विविध खटले दाखल करण्यात आले आहेत. कंगनावर (Kangana Ranaut) टीका केल्याने उर्मिला मातोंडकरला (Urmila Matondkar) शिवसेनेने पदराखाली घेतले. शिवसेनेचे बळ मिळाल्याने उर्मिलाने आता कंगनावर बाण सोडणे सुरु केले आहे. मात्र कंगनाही आता राजकीय आखाड्यात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि याला कारणीभूत ठरले आहे तिचे एक ट्विट.

कंगनाने नुकतेच एक ट्विट केले आहे. ‘नवा दिवस, नवी केस… काही राजकीय पक्ष माझ्यावर अशी गुंतवणूक करीत आहेत जणू मी कोणी एखादी मंत्री आहे. प्रत्येक दिवशी मला एका राजकारणी व्यक्तीप्रमाणे घेरले जाते. न्यायालयीन खटले आणि विरोधी पक्षांचा सामना करावा वागतो. मला कोणाचेही समर्थन नाही. माझं फक्त चित्रपटांवर प्रेम आहे. पण सध्याची स्थिती पाहता मी कदाचित….’ असे तिने या ट्विटमध्ये म्हणत राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER