शिवभोजन थाळी’ला सिद्धिविनायक पावला, ५ कोटींचे मदत जाहीर

siddhivinayak-temple-trust-has-contribute-rs-5-crores-to-shiv-bhojan

मुंबई : महाविकास आघाडीचा त्यातल्या त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अगदी प्रतिष्ठेच्या केलेल्या.महत्वकांक्षी प्रकल्प म्हणजेच शिवभोजन थाळीला मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने सुमारे पाच कोटी रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वस्तांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्यावतीने महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेसाठी ५ कोटी रुपयांचे सहकार्य करणार आहे. उद्धव ठाकरे सरकारने राज्यात केवळ दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’ ही योजना सुरु केली आहे. सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.यात संचालक मंडळ यांनी दुपारी सर्वसामान्य लोकांची भूक भागवणाऱ्या या प्रकल्पाला काहीतरी मदत करावी या हेतूने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.त्याचबरोबर सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास हे नेहमी लोकांच्या भल्यासाठी काम करत असल्यामुळे यात राजकीय हेतू नाही,असेही बांदेकर यांनी म्हटले आहे.

या योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गरीबांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या योजनेचा लाभ श्रीमंत लोकही घेऊ शकतात. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शिवसेनेने या योजनेचा समावेश केला होता.