सिद्धीविनायक मंदिराची रचनात्मक दुरूस्ती करणार

Siddhivinayak temple

मुंबई :- प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे रचनात्मक दुरूस्तीचे काम या वर्षाच्या अखेरीस करण्याचे ठरले आहे. मंदीराच्या वास्तुचे ऑडीट केल्यानंतर लमंदिराला तडे गेलेले आढळले आहे. तसेच, संगमरवरी क्लेडिंग सैल झाली आहे आणि मंदीराच्या घुमट मजबुतीकरणाचीही आवश्यकता आहे.

सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले, “आम्ही ई-निविदा काढली. काही महिन्यांपूर्वीच स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले होते, ज्यामधून मंदीराच्या संरचनेत क्रॅक सापडले. भावीकांनीही ही बाब लक्षात आणून दिली. त्यामुळे मंदीराची दुरूस्ती होणे आवश्यक असून त्यानंतर मंदीर पूढे 30-40 वर्षे सुरक्षीत असेल. असे बांदेकरांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : सरकारने परवानगी दिल्यास शिर्डीतील साईमंदिर खुले करण्यास संस्थान सज्ज

या कामादरम्यान मंदीर बंद ठेवण्यात येईल असेही आदेश बांदेकर यांनी सांगितले. तसेच, मंदिराच्या दुरुस्तीच्या कामासाठी पोलाद, संगमरवरी आणि सिमेंट यासारख्या साहित्यात भावीकांनी आणि सिद्धिविनायक ट्रस्टींनी हातभार लावाव असे बांदेकर म्हणाले. “यामुळे खर्च कमी होईल आणि मंदिराच्या निधीची बचत होईल, गरजूंना वैद्यकीय मदत देण्यासारख्या चांगल्या वापरासाठी मंदीराचा निधी वापरता येईल.” असे बांदेकर म्हणाले.

दुरुस्ती सल्लागार चेतन रायकर म्हणाले, “सुमारे 25 वर्षांपूर्वी मंदीराची पुनर्बांधणी करण्यात आली होती. ही एक आरसीसी रचना आहे असे त्यांनी सांगितले. तर, बांदेकर म्हणाले, मंदीर समुद्रकिना-याला लागलेले असल्यामुळे मंदीराला नैसर्गिक गंज लागल्याचे बांदेकर म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER