सिद्धार्थ आनंद आता ऋतिकला बनवणार ‘फायटर’

sidharth hrithik

सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand)हा हॉलिवुडच्या धर्तीवर अॅक्शन पॅक्ड चित्रपट बनवण्यावर विश्वास ठेवतो. त्याने ऋतिक रोशन आणि कॅटरीना कैफला घेऊन बँग बँग चित्रपट केला होता. टॉम क्रूजच्या डे अॅन्ड नाईटची कॉपी असलेला हा चित्रपट बऱ्यापैकी चालला होता. त्यानंतर सिद्धार्थने ऋतिकला (Hrithik Roshan) एका वेगळ्या भूमिकेत आणून वॉर चित्रपट तयार केला होता. टायगर श्रॉफलाही यात खलनायकाची भूमिका दिली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान चालला होता. ऋतिक आणि टायगरची जुगलबंदी बघायला प्रेक्षकांना खूपच आवडले होते. सिद्धार्थ आणि ऋतिक रोशन आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सिद्धार्थने ऋतिकसाठी एक कथानक शोधून ठेवले असून ‘फायटर’ नावाने या चित्रपटाची निर्मिती करण्याचे घाटत आहे. हा चित्रपटही ऋतिकच्या इमेजला साजेसा म्हणजे अॅक्शनने भरलेला असणार आहे.

‘वॉर’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेसच सिद्धार्थने ऋतिकला फायटर चित्रपटाची कथा ऐकवली होती. ऋतिकला कथा खूपच आवडली होती आणि त्याने लगेचच त्याला होकार दिला होता. लॉकडाऊनमध्ये सिद्धार्थने ‘फायटर’ची पटकथा लिहून पूर्ण केली आहे. फायटर जेट विमानावर आधारित हे कथानक असून याचे शूटिंग 2022 मध्ये केले जाणार असून 2022 च्या ख्रिसमसमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार सुरु आहे.

सिद्धार्थ सध्या यशराजच्या शाहरुख खान अभिनीत ‘पठाण’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटानंतर फायटरच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. फायटरचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ऋतिकही क्रिश 4 चे शूटिंग सुरु करणार आहे. सिद्धार्थ ऋतिकसोबत वॉर 2 बनवण्याचाही विचार करीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER