‘श्याम रसोई’ देते हजार लोकांना रोज फक्त १ रुपयात जेवण !

Shyam Rasoi

दिल्ली : प्रवीणकुमार गोयल (Praveen Kumar Goyal) (५१) यांचे नांगलोई परिसरात शिवमंदीराजवळ ‘श्याम रसोई’ (Shyam Rasoi) हे लहान दुकान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे फक्त १ रुपयात जेवण मिळते ! निःशुल्क अन्न मिळते म्हणून लोकांनी ते वाया घालू नये यासाठी हा १ रुपया घेण्यात येतो. श्याम रसोईसाठी सोशल मीडियावर प्रवीण कुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

या उपक्रमाची माहिती देतांना प्रवीण म्हणालेत – रोज सुमारे १ हजार लोकांना जेवण पुरवण्यात येते. कोणी कधी-कधी पैशांची किंवा धान्याची मदत करतात. सुरूवातीला १० रुपये घेत होतो. आता फक्त १ रुपया घेतो.

सोशल मीडियावर प्रवीणकुमार यांच्या स्वयंपाक घराचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. २८८ पेक्षा जास्त लोकांनी हे फोटो रिट्विट केले असून १ हजारांपेक्षा जास्त ‘लाईक्स’ मिळाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER