आम्हाला कृपया लसींचा पुरवठा करा ; सुप्रिया सुळेंची केंद्राला विनंती

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना लसीच्या तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लसच उपलब्ध नसल्याने पुणे जिल्ह्यातील १०९ लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद झालं (shut-in-pune-due-to-vaccine-shortage) आहे. लोकसभा खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी याबाबत माहिती दिली.

पुणे जिल्ह्यात बुधवारी लसींचा साठा संपल्याने १०९ लसीकरण केंद्र बंद होते. ३९१ केंद्रांवर बुधवारी ५५ हजार ५३९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पण, लसीचा साठा संपल्यामुळे हजारो लोकांना लसीकरण न करताच परत जावं लागले, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरद्वारे सांगितले .

शिवाय, लसीच्या अभावामुळे आपला लसीकरणाचा वेग कमी होऊ शकतो. जीव वाचविण्यासाठी, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर आणण्यासाठी संमती असलेल्या प्रत्येकाला लस देण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे कृपया आम्हाला लसीचा पुरवठा करा, अशी विनंती त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना टॅग करत केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button